मेनिंगोकोकल मेनिंजायटीस : एक दुर्मिळ परंतु उध्वस्त करण्याची क्षमता असणारा आजार

Image: Shutterstock

मेनिंजायटीस म्हणजे काय?

मेनिंजायटीस म्हणजे मेंदू आणि पाठीचा कणा यांच्यावरील संरक्षित पडद्याला सूज येऊन दाह निर्माण होणे (याला मेनिंजेस असेही म्हणतात.) मेंदू आणि पाठीचा कणा यांच्याभोवती असलेल्या द्रव पदार्थाला होणाऱ्या जीवाणू व विषाणू संसर्गामुळे पडद्याला सूज येते.(1). यामुळे इतर काही संसर्ग, औषधे व मेनिंजायटीसची जखम होण्याकरता वाट मोकळी होते.

मेनिंगोकोकल मेनिंजायटीस : उध्वस्त करणारा संसर्ग

इनव्हेजिव्ह मेनिंगोकोकल आजार (आयएमडी) हा नायसेरिया मेनिंगीटीडीस मुळे होणारा एक दुर्मिळ परंतु उध्वस्त करणाऱ्या विषाणूंचा संसर्ग आहे. सामान्यत: मेंदू (मेनिंगीटीडीस) आणि/किंवा रक्तामध्ये (रक्तदोष, रक्तातील विषबाधा) (2) या स्वरूपात हा संसर्ग आढळून येतो. वैद्यकीय क्षेत्रात प्रगती झाली असली तरी हा आजार अगदी काही तासांत माणसाचा जीव घेऊ शकतो किंवा माणसाचे आणि त्यांच्या कुटुंबीयांचे आयुष्य दीर्घकाळासाठी उध्वस्त करणारा गंभीर परिणाम साधू शकतो. (2) या सगळ्यामुळे होणारा लक्षणीय आर्थिक आघात समाजावर आयुष्यभर राहातो. (3)

हा अत्यंत बेभरवशाचा आजार जगातील कुणालाही, कुठल्याही वयात, कुठेही होऊ शकतो. तथापि, काही लोकांमध्ये हा आजार होण्याची शक्यता इतरांपेक्षा जास्त असते (2). काहींच्या बाबतीत, या आजाराचे पहिले लक्षण दिसल्यानंतर अवघ्या २४ तासात या व्यक्तींचा मृत्यू होतो (4). भारतामध्ये गेल्या १० वर्षांत मेनिंगोकोकल मेनिंजायटीसचे ५०,००० पेक्षा जास्त रुग्ण सापडले आहेत. त्यांपैकी ३००० पेक्षा जास्त रुग्णांवर मृत्यूने झडप घातली आहे (5).

अहवालानुसार, या आजाराने १० पैकी एका रुग्णाचा जीव घेतला असून १०-२०% रुग्ण अपंगत्व, अंगावरील डाग, बहिरेपणा किंवा मेंदूला झालेली दुखापत अशा गंभीर शारीरिक इजांनी त्रस्त आहेत. (6), (7)

या रोगाचा संसर्ग कुणालाही होऊ शकतो.

मेनिंगोकोकल मेनिंजायटीस हा आजार मुख्यत्वे पाच वर्षाखालील मुले, पौगंडावास्थेतील मुले व तरुण मुलांमध्ये दिसत असला तरी तो जगभरातील कुणालाही, कुठेही होऊ शकतो. बहुतेक वेळा मेनिंगोकोकल मेनिंजायटीस हा आजार कोणत्याही आजाराचा धोका नसलेल्या सुदृढ व्यक्तींना होतो. विशेषत: हा आजार वयस्कर व्यक्तींमध्ये मोठ्या प्रमाणात दिसून आला आहे. (8)

या आजाराचे प्रमाण वाढवणारे घटक खालीलप्रमाणे:

  • विशिष्ट समुहांमध्ये राहताना (उदा. सैन्य दलातील व महाविद्यालयातील विद्यार्थी) किंवा हज, मुस्लीम समाजाची मक्का येथे जाणारी वार्षिक यात्रा यांसारख्या मोठा जनसमूह असलेल्या यात्रांमध्ये सामील होणे. (9)
  • काही वैद्यकीय समस्या, जसे की, एचआयव्ही संसर्ग, वेदनाशामक औषधांचे सेवन/ रोगप्रतिकारक शक्तीची कमतरता/ इम्युनोग्लोब्यूलिन्सची कमतरता असणे किंवा प्रमाण अधिक असणे. (9)
  • आफ्रिकेतील सहारान सारख्या मेनिंजायटीस प्रभावित क्षेत्रात प्रवास करणे. (9)

सर्व प्रकारच्या मेनिंजायटीस प्रतिबंधक लसी देऊन आजारापासून संरक्षण करणे.

मेनिंजायटीस हा विषाणूंमुळे आणि/ किंवा इतर कारणांमुळे होणारा संसर्गजन्य/ गंभीर आजार आहे. दुर्दैवाने, या सर्व कारणांना प्रतिबंध करणारी लस उपलब्ध नाही. (10).

विषाणूप्रणित मेनिंजायटीस संसर्गाच्या मुख्य ३ कारणांसाठी लस उपलब्ध आहे. ही तीन कारणे पुढीलप्रमाणे :

  • ज्यामुळे न्युमोनिकल मेनिंजायटीस होतो असा स्ट्रेपोकोकस मेनिंजायटीस,
  • हेमोफीलस मेनिंजायटीसचे कारण असणारा हेमोफिलस इन्फ्ल्यूएन्झा टाईप बी
  • मेनिंगोकोकल मेनिंजायटीसला कारणीभूत ठरणारा नायसेरिया मेनिंजीटीडस
  • आपल्या बालरोगतज्ञाशी विषाणूप्रणित मेनिंजायटीसच्या या तीन सामान्य कारणांविषयी आणि या आजारापासून आपल्या बाळाचे संरक्षण करण्यासाठी आवश्यक मार्गांविषयी चर्चा करा.

मेनिंजायटीसच्या विरोधात एकजुटीने सक्रीय होऊ

मेनिंगोकोकल मेनिंजायटीसचा धोका मोठा असला तरी त्याबद्दलची जागरूकता मात्र कमी आहे. या आयुष्य उध्वस्त करणाऱ्या गंभीर आजाराविषयी जनजागृती करून या जागरूकता मोहिमेत सहभागी व्हा. आपल्या सोशल मिडीयावरून हा लेख शेअर करून आपण सगळे एकजुटीने मेनिंजायटीसच्या विरोधात उभे राहूया.

हा लेख सानोफी पाश्चर यांच्याकडून जनहितार्थ जारी करण्यात आला आहे.

Author: Niharika