मेनिंजायटीस – उपचारांपेक्षा प्रतिबंध श्रेयस्कर!

Image: Shutterstock

पालक होणे हा आयुष्य बदलून टाकणारा अनुभव आहे. पालकत्वाने आपले प्राधान्यक्रम बदलतात. तुम्ही मस्त कलंदर आणि निवांत आयुष्याकडून काळजीवाहू आणि संरक्षित आयुस्ज्याकडे प्रवास करता. जे पालक मुलाला साधा ताप आला तरी त्याच्या लक्षणांविषयी वाचतात अशा काहीशा वेड्या पालकांपैकीच मी एक आहे. मी त्या वेड्या पालकांपैकी आहे जे शक्य त्या सर्व लसीकरणासाठी बाळाला घेऊन जातात. मला जुळी मुळे आहेत. त्यांच्या रोगप्रतिकारक शक्तीवर होणारा खर्च अफाट आहे. परंतु, मी माझ्या मुलांना प्रत्येक लस देते. हे मी मला परवडते म्हणून करत नाही तर, मी माझ्या मुलांना आरोग्याच्या तक्रारीसाठी आणि सदैव दुर्लक्षित असणाऱ्या जीवघेण्या आजारांना बळी पाडून गमावू इच्छित नाही म्हणून करते.

कदाचित तुम्हाला फार कठोर आणि ठाम वाटेन, पण कोणीही लसीकरणाकडे दुर्लक्ष करू नये हे मात्र मी कळकळीने सांगेन. आरोग्यावर प्रतिबंधात्मक उपाय अत्यंत महत्त्वाचे आहेत. आणि हेच तुम्ही तुमच्या मुलाला दिलेले सर्वोत्तम बक्षीस असेल. आज, मी विशेषत्वाने लसीकरणाचा आणि प्रतिबंधात्मक उपाय या विषयाचा ४० वर्षे अनुभव असणारा संशोधक तज्ञ सानोफी पाश्चर याने निर्माण केलेल्या मेनिंजायटीस लसीविषयी बोलणार आहे.

मेनिंजायटीस हा साधा सर्दी- खोकल्यातून एका मुलाकडून दुसऱ्या मुलाकडे संक्रमित होणारा बेभरवशाचा आणि दुर्मिळ आजार आहे. मेनिंजायटीसची सामान्य लक्षणे दिसणाऱ्या पौगंडावस्थेतील मुलांच्या संपर्कात येणाऱ्या पाच वर्षांखालील मुलांना हा आजार अगदी सहज होतो. हा संसर्ग मेंदूला इजा पोहोचवतो आणि/किंवा रक्तपेशींमध्ये स्थिरावतो, या आजाराचे निदान आणि उपचार वेळेत झाले नाहीत तर ४८ तासांत या व्यक्तीचा मृत्यू होऊ शकतो. या आजाराचे गंभीर परिणाम मुलाला पुढे आयुष्यभर सोसावे लागतात.

ताप येणे, थकवा येणे, भूक न लागणे,आकडी येणे, डोक्यावरील त्या नाजूक भागावर सूज येणे आणि एकसारखे कण्हणे ही मेनिंजायटीसची सुरुवातीची लक्षणे आहेत. ही सगळी लक्षणे सामान्य तापासारखीच वाटतात. बरोबर ना? म्हणूनच मुलांना हा जीवघेणा आजार होण्याआधीच त्यांना मेनिंजायटीस प्रतिबंधात्मक लस देणे आवश्यक आहे.

२०१६ आणि २०१७ च्या माहितीनुसार २०१६ मध्ये भारतात सापडलेल्या ३२५१ रुग्णांपैकी २०५ रुग्णांना गंभीर स्वरूपाचा आजार झाला. २०१७ मध्ये, सापडलेल्या ३०८७ रुग्णांपैकी १४६ रुग्णांचा मृत्यू झाला. हा आजार मुलींपेक्षा मुलांना अधिक प्रमाणात होत असल्याचे देखील या माहितीने दर्शवले आहे. आंध्र प्रदेश, बिहार, ओडिशा आणि कर्नाटकाबरोबरच भारतामध्ये या आजाराचे सर्वात जास्त रुग्ण पश्चिम बंगालमध्ये आढळतात.

मेनिंजायटीस या दुर्धर आजारापासून नवजात बालकांचे संरक्षण करण्यासाठीचे मार्ग खालीलप्रमाणे :

  • कोणत्याही आजाराचा संसर्ग झालेल्या व्यक्तींपासून आणि थंड वातावरणापासून आपल्या बाळाला दूर ठेवणे. हा आजार संसर्गजन्य असल्याने तो संक्रमित होतो आणि बाळाच्या आरोग्यासाठी गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते.
  • शक्य तेव्हा बाळांना गर्दीपासून आणि डासांपासून लांब ठेवणे.
  • बाळासाठी जेवण किंवा दुधाची बाटली तयार करताना आणि बाळाला स्पर्श करताना हात स्वच्छ करणे.
  • ३५ ते ३७ आठवडे गरोदर असलेल्या बाईची गट-ब स्ट्रीप चाचणी करून घ्यावी. चाचणीचा निकाल सकारात्मक आल्यास त्यांच्यावर औषधोपचार करावे.

या आजाराला प्रतिबंध घालण्यासाठी मुलांना मेनिंगोकोकल कोन्ज्युगेट लस द्यायला हवी, याला mcv4 असेही म्हणतात. ११ वर्षांच्या वरील वयाच्या मुलांना ही लस दिली जाते. ९ ते १५ महिने वयाच्या मुलांना MMR लस दिली जाते. हीच लस ४ ते ६ वर्षांच्या मुलांना पुन्हा देण्यात येते.

सानोफी पाश्चर याच्या या लसीची किंमत साधारण ५००० रुपये इतकी आहे. ही किंमत कदाचित जास्त वाटू शकते, पण आपण आपल्या बाळाच्या आरोग्याच्या बाबतीत बेफिकीर राहू इच्छितो का?

ताजा कलम : ही माहिती आजाराची प्राथमिक पातळीची कल्पना देते. याबद्दल अधिक माहिती घेण्यासाठी आपण आपल्या वैद्याचा सल्ला घेऊ शकता. सर्व नागरिकांनी, विशेषत: मेनिंजायटीसचे रुग्ण जिथे सर्वाधिक आढळतात अशा ठिकाणी राहाणाऱ्या लोकांनी कायम सतर्क राहायला हवे.

संदर्भ :

Author: Chandrama