मेनिंगोकोकल मेनिंजायटीस विषयी जनजागृती मोहीम # मेनिंजायटीसविरोधातएकजूट

Image: Shutterstock

आमचा मित्र नुकताच आफ्रिकेतील सब- सहारान देशांची सहल करून आला होता.तो दिवस मला आजही आठवतो. त्यावेळी त्यांच्या जवळपास १३ वर्षांच्या मुलीला अचानक अंगावर हलके लाल चट्टे उठले आणि ताप भरून आला. हा संसर्गजन्य ताप आहे असे समजून त्यांनी तिला त्वरित डॉक्टरकडे नेले. हळूहळू तिला खूप झोप येऊ लागली, तिचे अंग ठणकू लागले, तिचे उच्चार अस्पष्ट होऊ लागले आणि ती बरळू लागली. तिची प्रकृती खालावली. तिला तात्काळ अतिदक्षता विभात हलवण्यात आले आणि तिच्यावर औषधोपचार सुरु झाले. तिच्या पाठीच्या कण्यातील स्त्रवणारा द्रव परीक्षणासाठी पाठवण्यात आला.

मला तिच्या या आजाराची काहीही कल्पना नसणाऱ्या आई-वडीलांचे भरलेले डोळे आठवतात. एका १०५ अंश ताप असलेल्या आणि अंगावर चट्टे उठलेल्या मुलीवर उपचार चालू होते. यामुळे एका महिन्यानंतर बऱ्या झालेल्या तिच्या वाट्याला मेंदूचा आजार आणि अंशत: बहिरेपण आले होते.

मेनिंगोकोकल मेनिंजायटीस: धोका कोणाला आहे?

मेनिंगोकोकल मेनिंजायटीस मुख्यत: पाच वर्षांखालील मुले, पौगंडावस्थेतील मुले व प्रौढांना होतो. या संसार्गावर त्वरित उपचार केले नाहीत तर जीव धोक्यात असण्याचे प्रमाण ५० % आहे. (1) ! खालील बाबतीत या आजाराचा धोका बळावतो.

  • जेव्हा तुमची रोगप्रतिकारक शक्ती कमी असते.
  • तुम्ही आफ्रिकेतल्या मेनिंजायटीस प्रभावित क्षेत्रात फिरत असाल
  • तुम्ही मोठ्या लोकसमूहात सहभागी होता

हा मेनिंजायटीस केवळ मानवालाग्रासतो. आणि आपल्या श्वासोच्छ्वास प्रक्रियेतून, खोकल्यातून किंवा संसर्ग झालेल्या व्यक्तीच्या अति संपर्कातून संक्रमित होतो. तेव्हा, कायम स्वच्छता पाळा. व आपल्या मुलांना देखील योग्य स्वच्छतेचे महत्त्व पटवून द्या.

मेनिंगोकोकल मेनिंजायटीस लसीकरण : जीवघेण्या आजाराला दूर ठेवण्याचा प्रभावी उपाय

मेनिंगोकोकल मेनिंजायटीस हा मेंदूला इजा पोहोचवणारा गंभीर आजार असल्याने त्यासाठी प्रतिबंधात्मक लसीकरण करवून घेणे गरजेचे आहे. अनेक विषाणूंचे समूह मेनिंगोकोकल मेनिंजायटीस ला कारणीभूत ठरतात. परंतु, त्यांपैकी मेनिंजायटीसला पाच विषाणूंना प्रतिबंध घालणारी लस उपलब्ध आहे ही अत्यंत चांगली बातमी आहे. मेनिंगोकोकल कोन्ज्यूगेट लस ही लस ९ महिने ते ५५ वर्षे वयोगटातल्या कोणत्याही मानवाला देण्यासाठीची अधिकृत लस आहे. (2). पौगंडावस्थेतील मुले या संसर्गाला सर्वात जास्त बळी पडतात. पौगंडावस्थेतील सर्व मुलांना ११-१२ व्या वर्षी MCV लस घेणे आवश्यक आहे, आणि १६ व्या वर्षी पुन्हा एकदा तीच लस घेणे आवश्यक आहे (3)

सामान्यत: ह्या लसी सुरक्षित असतात. परंतु, एखाद्या व्यक्तीला ही लस घेतल्यानंतर हलका ताप येणे आणि त्वचा लाल होणे असे दुष्परिणामांना सामोरे जावे लागते. परंतु, ही शारीरिक स्थिती १-२ दिवसात पूर्ववत होते.

भारतात मेनिंगोकोकल मेनिंजायटीस साठी असलेली लस अजूनही बंधनकारक केलेली नाही. परंतु, पाच वर्षांखालील मुलांमध्ये या आजाराचे वाढते प्रमाण बघता मेनिंगोकोकल कोन्ज्यूगेट लस लहान मुलांना द्यायलाच हवी. हीच खरी वेळ आहे मेनिंगोकोकल मेनिंजायटीस बद्दल आपल्या बालरोगतज्ञाशी चर्चा करायची आणि आपल्या मुलांना प्रतिबंधात्मक लस देऊन आणण्याची.

मुलांना एक आनंदी आणि रोगमुक्त आयुष्य द्या!

संदर्भ :

1. https://www.who.int/news-room/fact-sheets/detail/meningococcal-meningitis

Author: Beena