मुलांमधला मेनिंगोकोकल मेनिंजायटीस – एक आढावा

Image: Shutterstock

इतर आयांप्रमाणे मलाही माझ्या पहिल्या मुलाच्या जन्मानंतर बालरोगतज्ञांकडून मेनिंजायटीस विषयी माहिती मिळाली. लसीकरणाचा आणि रोगप्रतिकारक शक्तीचा तक्ता मला ग्रीक आणि लॅटिन मध्ये दिसला हे सांगायला नकोच. मला प्रत्येक लसीबद्दल आणि रोगप्रतिकारक शक्तीचे महत्त्व जाणून घ्यायचे होते आणि माझ्या बालरोगतज्ञाने मला हे सर्व अतिशय संयमाने समजावून सांगितले.

त्या तक्त्याच्या तळाशी असलेल्या रकान्यात मेनिंगोकोकल मेनिंजायटीस असे लिहिलेले मला दिसले. मला या नावाशिवाय इतर सर्व लसींविषयी माझ्या मित्र आणि नातेवाईकांकडून कळाले होते. मी विचारल्यावर बालरोगतज्ञाने मला याबद्दल आणखी तपशीलवार माहिती दिली.

मेनिंगोकोकल मेनिंजायटीस म्हणजे काय?

मेनिंगोकोकल मेनिंजायटीस हा एक गंभीर विषाणूमुळे होणारा संसर्गजन्य आजार आहे. हा असा आजार आहे ज्यामुळे मेंदू व पाठीचा कणा यांच्याभोवती असलेल्या आवरणाला संसर्ग होतो. प्रत्येक १० पैकी एक माणूस आपल्या नाकामागे किंवा घशामागे मेनिंगोकोकल मेनिंजायटीस चा विषाणू घेऊन या आजाराचे कोणतेही लक्षण न दिसता जगत असतो. यालाच वाहक असे म्हणतात. (1). हा आयुष्य उध्वस्त करणारा असा दुर्मिळ आजार आहे ज्यामुळे २४ तासाच्या आत माणसाचा जीव जाऊ शकतो. (5) या आजाराने १० पैकी एका रुग्णाचा जीव घेतला असून १०-२०% रुग्ण अपंगत्व, अंगावरील डाग, बहिरेपणा किंवा मेंदूला झालेली दुखापत अशा गंभीर शारीरिक इजांनी त्रस्त आहेत (4).

मेनिंगोकोकल मेनिंजायटीस या आजाराची कारणे काय आहेत?

मेनिंगोकोकल मेनिंजायटीस होण्याची दोन प्राथमिक कारणे आहेत. – संसर्ग आणि विषाणू . मेनिंगोकोकल मेनिंजायटीस हा लहान मुले व पौगंडावस्थेतील मुलांना मेनिंजायटीस होण्याकरता कारणीभूत असणारा विषाणू आहे. नवजात बालके आणि पाच वर्षांखालील लहान मुले, आणि पौगंडावस्थेतील म्हणजेच १५ ते १७ वर्षांमधील मुले यांना या आजाराचासार्वाधिक धोका असतो.

मेनिंगोकोकल मेनिंजायटीसची लक्षणे कोणती?

मेनिंगोकोकल मेनिंजायटीसचे मुख्य लक्षण तापाच्या लक्षणाप्रमाणे असते. (1). ही लक्षणे खालीलप्रमाणे.

 • ताप
 • त्वचेवरील पुरळ
 • उलट्या
 • डोकेदुखी
 • जड गळा
 • प्रकाशाला अतीव संवेदनशील आणि झोपेची गुंगी येणे

मेनिंगोकोकल मेनिंजायटीसची लक्षणे एका ठराविक प्रकारची नसतात. ही लक्षणे एकापाठोपाठ एक, एकत्र दिसतात किंवा अजिबातच दिसत नाहीत. त्यामुळे, नेहमीच सतर्क रहा. आपल्या पाल्याला ताप आल्यास त्वरित डॉक्टरचा सल्ला घ्या.

नवजात बालकांमध्ये हीच लक्षणे थोडी वेगळ्या प्रकारे दिसतात.  (3). यामध्ये खालील लक्षणांचा समावेश होतो.

 • ताप
 • अभावानेच दिसणारे मोठ्या आवाजातील रडणे
 • कडेवर घेतल्यानंतर बाळ अस्वस्थ असणे
 • बाळाला झोपेतून उठायला त्रास होणे.
 • भूक न लागणे, काहीही खाण्या-पिण्याला नकार देणे
 • शून्यात नजर लावणे
 • निस्तेज किंवा डागाळलेली त्वचा
 • अंगावर दाब देऊनही नाहीसे होत नाहीत असे चट्टे किंवा डाग (याला परपुरा किंवा पेटेचियेई) असेही म्हणतात.
 • त्रासून जाणे
 • उलट्या
 • शरीर फुगणे
 • गळा मागे झुकणे

मेनिंगोकोकल मेनिंजायटीसला कशाप्रकारे प्रतिबंध करता येईल?

मेनिंगोकोकल मेनिंजायटीस हा एक गंभीर दुर्मिळ आजार आहे. या आजारावर योग्य वेळेत व योग्य प्रकारे औषधोपचार झाले नाहीत तर माणसाचा जीव जाऊ शकतो. सालीव्हा आणि इतर मौखिक पद्धतीने याचा संसर्ग होऊ शकतो. या आजाराचे निदान झाल्यावर किंवा लक्षणे दिसल्यावर लगेचच औषधोपचार सुरु करणे हा या आजारातून बाहेर पडण्याचा एकमेव मार्ग आहे. मेनिंगोकोकल मेनिंजायटीस साठी लसीकरण करून घेणे हा या आजारापासून वाचण्याचा सर्वोत्तम उपाय आहे. मेनिंगोकोकल कोन्ज्यूगेट लस (MCV) ही लस सर्वत्र उपलब्ध असून ती ९ महिने व त्यापेक्षा कमी वयाच्या बाळांना देता येईल.  (6). चला तर, उशीर होण्याआधी हे लसीकरण करून घ्या.

संदर्भ :

 1. https://www.cdc.gov/meningococcal/about/causes-transmission.html
 2. https://www.meningitisnow.org/meningitis-explained/after-meningitis/after-effects-of-septicaemia/
 3. https://www.medicalnewstoday.com/articles/321033.php
 4. https://www.betterhealth.vic.gov.au/health/conditionsandtreatments/meningococcal-disease
 5. https://www.sanofi.com/en/about-us/the-devastating-impact-of-meningitis
 6. https://www.indianpediatrics.net/dec2013/dec-1095-1108.htm

सूचना : या लेखामध्ये मांडलेली मते ही लेखकाची स्वतंत्र व नि:पक्षपाती मते असून मेनिंगोकोकल मेनिंजायटीस या आजाराची अधिक माहिती घेण्यासाठी आपल्या डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या. प्रस्तुत लेख सानोफी पाश्चर याच्या मेनिंजायटीस या आजाराविषयीच्या जनजागृती मोहिमेचा एक भाग असून याविषयी अधिक संशोधन झाल्यास या लेखात बदल केले जातील. या बदलांसाठी लेखक किंवा प्रकाशक जबाबदार राहणार नाहीत.

Author: Chandrama