तुमच्या मुलाला मेनिंगोकोकल लस देणे जिकीरीचे का आहे?

Image: Shutterstock

माझा मुलगा १० महिन्यांचा असताना एकदा सकाळी उठला तो आजारी पडूनच. तसे पहायला साधी सर्दी झाली होती परंतु तो अस्वस्थ झाला होता. मी त्याला घेऊन बालरोगतज्ञाकडे धाव घेतली. मी दवाखान्यात डॉक्टरला भेटण्यासाठी माझा नंबर येण्याची वाट पाहात बसले असताना सहज माझी नजर शेजारच्या टेबलवर असलेल्या एका पत्रकाकडे गेली. त्यामध्ये मेनिंगोकोकल मेनिंजायटीस या आजारच्या लक्षणांविषयी माहिती होती. ही सगळी लक्षणे मला त्या क्षणी माझ्या मुलामध्ये दिसत होती. माझ्या मुलाला ही रोगप्रतिबंधक लस देण्यात आली नसल्याचे माझ्या लक्षात आले. त्यानंतर, डॉक्टरांनी माझ्या मुलाला तपासून साधा सर्दी- खोकला असल्याचे सांगितले. तो पूर्णपणे बरा झाल्यानंतर काही काळाने मी त्याला मेनिंगोकोकल मेनिंजायटीस प्रतिबंधक लस देऊन आणले.

त्या दिवशी मला वाटलेली भीती माझ्या आजही स्मरणात आहे. प्रथमदर्शनी अजिबात लक्षात न येणारी ही लक्षणे पाहता या भयंकर आजाराने माझे मुल गमावण्याची भीती मनात दाटून आली. म्हणूनच, एक आई या नात्याने मेनिंगोकोकल मेनिंजायटीसबद्दल मला असलेली सगळी माहिती तुम्हालाही देणे मला महत्वाचे वाटते. खूप उशीर होण्याआधी तुम्हीही याबाबत कृती कराल अशी आशा आहे.

मेनिंगोकोकल कोन्ज्युगेट लस (MCV) ही लस विषाणूप्रणित मेनिंजायटीसचे कारण असणाऱ्या ३ सामान्य विषाणूपैकी एका विषाणू पासून आपले रक्षण करते. मेनिंगोकोकल मेनिंजायटीस हा पहिले लक्षण दिसल्यापासून अवघ्या २४ तासांत माणसाचा जीव घेऊ शकणारा एक भयंकर आजार आहे. यातून जरी रुग्ण बचावला tree त्याला आयुष्यभराचे अपंगत्व येऊ शकते. हा आजार दुर्मिळ स्वरूपाचा असल्याने सध्यातरी भारतामध्ये राष्ट्रीय लसीकरण मोहिमेअंतर्गत ही लस बंधनकारक नाही. परंतु, या आजाराचे गंभीर स्वरूप पाहता आपण आपल्या मुलाला मेनिंगोकोकल मेनिंजायटीस प्रतिबंधक लस दिलीच पाहिजे.

मेनिंजायटीस म्हणजे काय?

मेंदू आणि पाठीचा कणा यांच्या आवरणाला सूज येणे म्हणजे मेनिंजायटीस. मेंदू आणि पाठीच्या कण्याभोवती असलेल्या द्रवाला एखाद्या विषाणूने स्पर्श केला की हा भयानक आजार होतो. केवळ विषाणू नव्हे तर काही जखमा, कर्करोग, काही औषधे आणि इतर प्रकारातील संसर्ग देखील या आजाराला जन्म देतात.

मेनिंजायटीस चे प्रकार

मेनिंजायटीसचे प्रकार खालीलप्रमाणे.

 • विषाणूप्रणित मेनिंजायटीस : हा विषाणूमुळे होणारा आक्रमक आणि लवकर मूळ धरणारा आजाराचा प्रकार आहे. यामुळे मेंदूच्या आवरणाला सूज येते. विषाणूप्रणित मेनिंजायटीस होण्याचे मुख्य कारण म्हणजे नायसेरिया मेनिंगीटीडीस स्ट्रेप्टोकोकस.न्युमोनिया आमो हेमोफिलस इंफ्लूएन्झा टाईप बी विषाणू. विषाणूप्रणित मेनिंजायटीसला या सर्वसामान्य विषाणूंना प्रतिबंध घालणाऱ्या प्रभावी लसी उपलब्ध आहेत.
 • संसर्गजन्य मेनिंजायटीस : हे मेनिंजायटीसचे सर्वसामान्य कारण असून तुलनेने कमी गंभीर स्वरूपाचे आहे. बहुतेक रुग्ण कोणत्याही कायमस्वरूपी नुकसानाशिवाय यातून बरे होतात. परंतु, या आजारातून पूर्ण बरे होण्यासाठी अनेक आठवडे किंवा महिने जावे लागतात.

एन्टेरोव्हायरसेस (ज्यामध्ये घसा कोरडा होऊन बसतो) आणि मम्प्स संसर्ग मेनिंजायटीसला कारणीभूत ठरतो. या प्रकारच्या मेनिंजायटीसकरता कोणतीही लस उपलब्ध नाही.

मेनिंगोकोकल मेनिंजायटीसची लक्षणे:

हा जीवघेणा आजार आहे. आणि याचा संसर्ग होणाऱ्या पाच पैकी एका माणसाला गंभीर गुंतागुंतीच्या परिणामांना सामोरे जावे लागते.यातून ज्यांचा जीव वाचतो त्यांना बहिरेपणा, मेंदूला इजा होणे किंवा मेंदूचे आजार असे आयुष्यभर गंभीर परिणाम भोगावे लागतात. या आजाराचे निदान होणे हा आणखी एक समस्येचा भाग असतो. मेनिंगोकोकल मेनिंजायटीसची सुरुवातीची लक्षणे साध्या तापासारखीच असतात. याचबरोबर माणसाचे वय, रोगप्रतिकारक शक्ती आणि संसर्गाला दिलेली शारीरिक प्रतिक्रिया हे घटक व्यक्तीगणिक बदलत जातात.

मेनिंगोकोकल मेनिंजायटीसची सुरुवातीची लक्षणे पुढीलप्रमाणे:

 • साधारण अवस्थता जाणवणे
 • तीव्र व एकसारखी डोकेदुखी
 • गळा कडक होणे
 • अनिच्छा आणि उलट्या
 • तीव्र प्रकाशात अस्वस्थ वाटणे
 • अशक्तपणा किंवा सकाळी उठायला त्रास होणे
 • सांधेदुखी
 • संभ्रमावस्था आणि इतर मानसिक बदल

मेनिंगोकोकल मेनिंजायटीस होण्यात धोका काय आहे?

लहान मुलांची रोगप्रतिकारकशक्ती विकसनशील असते. त्यामुळे गंभीर विषाणूंच्या संसर्गापासून स्वत:चा बचाव करण्यास ते असमर्थ असतात. आणि, त्यांना नेमके काय त्रास होत आहेत हे ते सांगू शकत नसल्याने डॉक्टरला देखील या आजाराचे निदान करणे अवघड जाते. त्यामुळे त्यावर औषधोपचार करण्यास उशीर होतो.

मेनिंगोकोकलची लस घेण्यासाठी माझ्या बाळाचे आदर्श वय काय असावे?

 • लहान वयात घेतलेल्या मेनिंगोकोकलच्या लसीचे काही सौम्य शारीरिक दुष्परिणाम संभवतात. पुढच्या भेटीत मेनिंगोकोकल लस घेण्यासाठी बाळाचे वय काय असावे याबद्दल आपल्या बालरोगतज्ञाला विचारा.

मेनिंगोकोकल लस घेतल्यानंतर कोणते दुष्परिणाम होतात?

लहान वयात घेतलेल्या मेनिंगोकोकलच्या लसीचे काही सौम्य शारीरिक दुष्परिणाम संभवतात. त्याबद्दल तुम्ही तुमच्या बालरोगतज्ञाला विचारू शकता. पण त्यातील काही दुष्परिणाम खाली दिले आहेत.

 • ताप, डोकेदुखी, अनिच्छा, जुलाब
 • जिथे लस टोचली असेल त्या भाग लाल होऊन त्यावर सूज आल्याचे देखील तुम्हाला दिसेल.

माझ्या मुलाचा आहार पौष्टिक आहे, तरीही त्याला मेनिंगोकोकल मेनिंजायटीस होऊ शकतो का?

पौष्टिक आहार मुलांना कोणत्याही संसर्गापासून वाचवू शकत नाही. मुलांची रोगप्रतिकारक शक्ती पूर्णत: विकसित झालेली नसते. त्यामुळे त्यांना विषाणूंचा संसर्ग प्रौढ व्यक्तींपेक्षा लवकर होतो. नवजात बालके व लहान मुले शाळा, बगीचा आणि इतर लोकसमूह असलेल्या ठिकाणी सातत्याने जात असल्याने त्यांना हा आजार लवकर होऊ शकतो. ते स्वच्छतेविषयी पुरेसे जागरूक नसल्याने आपली पाण्याची बाटली देखील इतरांना देतात.

मेनिंजायटीस संसर्गजन्य असून तो सर्दी- खोकल्यातून पसरतो. त्याचबरोबर इतर श्वासोच्छवासाच्या व घशातील द्रव्यांच्या माध्यमातूनदेखील पसरतो. मेनिंगोकोकल लस देणे हा आपल्या बाळाला मेनिंगोकोकल मेनिंजायटीस च्या संसर्गापासून वाचवण्याचा सर्वोत्तम उपाय आहे.

जर मेनिंगोकोकल मेनिंजायटीस हा गंभीर आजार आहे तर, तो रात्रीय लसीकरण मोहिमेअंतर्गत अधिकृतपणे समाविष्ट का नाही?

कारण, भारतामध्ये हा आजार अधिकृतपणे दुर्मिळ आहे. दुर्मिळ असला म्हणून हा आजार गंभीर नाही असे म्हणता येत नाही. हा आजार अतिशय तंदुरुस्त असलेल्या लहान मुल/प्रौढ व्यक्तीला २४ तासांत संपवू शकतो यावरून या आजाराचे गांभीर्य लक्षात येत नाही का? २०१७ च्या राष्ट्रीय आरोग्य अहवालानुसार मेनिंजायटीसच्या आढळलेल्या ३२५१ रुग्णांपैकी २०५ रुग्ण गंभीर स्वरूपाचे असल्याचे सिद्ध झाले. हा मृत्युदर पाहता आपल्या मुलाला प्रतिबंधात्मक लस देणे किती गरजेचे आहे हे आपल्याला निश्चित पटेल.

पालक या नात्याने आपण आपल्या मुलांना सर्वोत्तम आयुष्य देण्याचा प्रयत्न करतो. आपणच आपल्या मुलांच्या निरोगी आयुष्यासाठी जबाबदार आहोत. तेव्हा, या आजाराचे स्वरूप जर इतके गंभीर असेल तर आपल्याला आता कृती करायलाच हवी.

संदर्भ :

1. https://www.emedicinehealth.com/meningitis_in_children/article_em.html
2. www.voicesofmeningitis.org
3. https://www.cdc.gov/meningococcal/about/symptoms.html
4. https://youtu.be/-hmNn-GEbO8?t=6
5. https://www.youtube.com/watch?v=XlomWOElXaQ

सूचना : या लेखामध्ये मांडलेली मते ही लेखकाची स्वतंत्र व नि:पक्षपाती मते असून मेनिंगोकोकल मेनिंजायटीस या आजाराची अधिक माहिती घेण्यासाठी आपल्या डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या. प्रस्तुत लेख सानोफी पाश्चर याच्या मेनिंजायटीस या आजाराविषयीच्या जनजागृती मोहिमेचा एक भाग असून याविषयी अधिक संशोधन झाल्यास या लेखात बदल केले जातील. या बदलांसाठी लेखक किंवा प्रकाशक जबाबदार राहणार नाहीत.

Author: Priyanka